प्रत्येक क्षण मानवतेसाठी समर्पित 
व्हावा ः माता सुदीक्षाजी महाराज

प्रत्येक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा ः माता सुदीक्षाजी महाराज

पुणे, ता. २५ : ‘‘निराकार प्रभुने आम्हाला हे जे मानव जीवन दिले आहे. त्याचा प्रत्येक क्षण मानवतेसाठी समर्पित व्हावा, असा परोपकाराचा सुंदर भाव हृदयात उत्पन्न होतो, तेव्हा खरेतर अवघी मानवता आपली वाटू लागते,” असे उद्गार सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी भाविकांना संबोधित करताना व्यक्त केले.
संत निरंकारी मिशन सामाजिक शाखा, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने भारतभर २०७ ठिकाणी विशाल रूपात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये सुमारे ५० हजार युनिट रक्त संकलित करण्यात आले. संत निरंकारी सत्संग भवन गंगाधाम पुणे येथे आयोजित रक्तदान शिबिरात ७९४ युनिट रक्तदान झाले, अशी माहिती पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांनी दिली. ससून रुग्णालय रक्तपेढी आणि वायसी. एम. रुग्णालय रक्तपेढीच्या टीमने रक्त संकलित केले.
सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज म्हणाल्या, ''''सेवा ही नेहमी निष्काम भावनेनेच केली जाते. अशी भावना जेव्हा आपल्या हृदयात निवास करते, तेव्हा खऱ्या अर्थाने आपले जीवन मानवतेच्या कल्याणार्थ समर्पित होते. कारण त्यावेळी सेवाभावना साकार व कर्मरूप धारण करून समस्त मानव परिवारासाठी वरदान बनून जाते. रक्तदान ही मनुष्य जीवन वाचविण्यासाठी केली जाणारी एक अशी सर्वतोपरी सेवा आहे, ज्यामध्ये परोपकाराची नि:स्वार्थ भावना निहित आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com