बस वाहतूक व्यावसायिकांचा 
आज बालेवाडीत मेळावा

बस वाहतूक व्यावसायिकांचा आज बालेवाडीत मेळावा

पुणे, ता. २५ : पुणे बस अँड कार्स ओनर्स असोसिएशन व पिंपरी-चिंचवड बस ओनर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व बस संघटनेचे प्रतिनिधी व व्यावसायिकांचा शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी ६ वाजता बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किडमध्ये मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती पुणे बस अँड कार्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनी दिली.
या मेळाव्याला राज्याचे अतिरिक्त परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पिंपरी-चिंचवड) तर अध्यक्षस्थानी हनुमंतराव गायकवाड उपस्थित राहणार आहे. या मेळाव्याला राज्यातून ५०० प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे जुनवणे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com