देशातील वातावरण अंधारमय : डॉ. बाबा आढाव

देशातील वातावरण अंधारमय : डॉ. बाबा आढाव

पुणे, ता. २५ : देशातील राजकारण अतिशय हीन पातळीवर पोहोचले आहे. सत्ताधाऱ्यांना आपण काय बोलतो ते समजत नाही. नागरिकांचे प्रश्न सोडून भावना भडकविणाऱ्या विषयांवर चर्चा होत आहे. हे वातावरण अंधारमय असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केली.
रिक्षा पंचायतच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त रिक्षा चालकांच्या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्‍घाटन डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. राजकारणातला डोळसपणा हरवला असून त्या जागी राजकीय नेत्यांना ‘अंधत्व’ आले असल्याचे ते आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी राज्य व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि एच. व्ही. देसाई रुग्णालयाचे अध्यक्ष राजेश शहा, कार्यकारी संचालक परवेझ बिलीमोरिया, जतन फाउंडेशनचे संचालक रवींद्र झेंडे, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार, पुणे गुजराती केळवणी मंडळाचे संदीप शहा, टॉयलेट सेवा स्वच्छतागृह विषयक चळवळीचे संचालक प्रीतम चोपडा, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत चव्हाण उपस्थित होते. यावेळी नितीन पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी सुमारे दीड हजार रिक्षा चालक व त्यांच्या कुटुंबीयांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. मोतीबिंदू असलेल्या रिक्षा चालकांच्या डोळ्यांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com