पुण्याहून दानापूर, गोरखपूरसाठी विशेष रेल्वे

पुण्याहून दानापूर, गोरखपूरसाठी विशेष रेल्वे

पुणे, ता. २५ : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. पुण्याहून दानापूर व गोरखपूरसाठी विशेष रेल्वे धावणार आहे.
------------
पुणे- दानापूर- पुणे
पुण्याहून २७ एप्रिलला रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल. तिसऱ्या दिवशी दानापूरला पहाटे साडे चार वाजता पोहचेल. दानापूरहुन २९ एप्रिलला सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. पुण्याला दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी पोहचेल.
गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
-----------------
पुणे- गोरखपूर - पुणे
पुण्याहून २७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी गोरखपूरला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पोहचेल. तर गोरखपूरहुन २८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटेल. पुण्याला तिसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी पोहचेल. गाडीला हडपसर, दौंड कॉर्डलाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, वीरांगना राणी लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, लखनौ, गोंडा आणि बस्ती आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com