mnvs agitation
mnvs agitationsakal

Pune News : निकृष्ट भोजनाविरोधात मनविसे आक्रमक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निकृष्ट जेवणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील निकृष्ट जेवणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना (मनविसे) आक्रमक झाली. शुक्रवारी (ता.२६) आंदोलन करत मनविसेने रिफ्रॅक्टरीतील जेवण प्रशासनातील अधिकाऱ्यांना खायला दिले. तसेच कुलगुरू कार्यालयात निकृष्ट जेवणाचे ताट नेत आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठ प्रशासन स्वतःच्या जेवणावर लाखो रुपये खर्च करतात, विविध कार्यक्रमांसाठी हजारो रुपयांचे जेवण बाहेरून मागवण्यात येते. परंतु विद्यार्थ्यांना आरोग्याला त्रासदायक बेचव जेवण दररोज देण्यात येते, असा आरोप मनविसेचे उप शहराध्यक्ष उप शहराध्यक्ष धनंजय दळवी यांनी केला.

ते म्हणाले, ‘नित्कृष्ट आणि दर्जाहीन जेवणामुळे ९८ टक्के विद्यार्थी रिफ्रेक्टरीत जेवत नाही. तेच विद्यार्थी रात्री उपाशी राहतात किंवा बाहेर खातात अशी विदारक परिस्थितीत विद्यापीठातील विद्यार्थी शिकत आहेत.’ रिफ्रेक्टरी शेजारी असलेले शंकर महाराज मठातील मोफत अन्नछत्राची खिचडी विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार असल्याचेही दळवी यांनी सांगितले.

आंदोलनात राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, विभाग अध्यक्ष आशुतोष माने, केतन डोंगरे, विभाग सचिव सूरज पंडित, विभाग उपाध्यक्ष ऋषिकेश जगताप, निखिल राजपूत, प्रज्वल अडगळे, जय लायगुडे , प्रतीक अनगळ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com