बुद्धिमत्तेचा वारसा ओळखून तो जोपासला पाहिजे

बुद्धिमत्तेचा वारसा ओळखून 
तो जोपासला पाहिजे

पुणे, ता. २९ ः ‘‘मूर्त आणि अमूर्त वारसा आपण समजून घेतो तसाच विचार, धोरणीपणा आणि बुद्धिमत्तेचा वारसा ओळखून तो देखील जोपासला पाहिजे. पुढच्या पिढीला सांगितला पाहिजे,’’ असे मत सरदार कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी राजे आंग्रे यांनी व्यक्त केले.
मणिलाल नानावटी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये वारसा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी संचालिका माधवी शिंदे, समन्वयक सुनील जिंगारे, ऋतुराज परदेशी, हेरिटेज टुरिझम विभागाच्या डॉ. भाग्यश्री पाटसकर उपस्थित होत्या.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी धोरणाचा परिचय करून देताना आंग्रे यांनी महत्त्वाच्या मोहिमा आणि महाराजांच्या युद्ध तंत्रातील बारकावे विशद केले. प्रांतोप्रांतीच्या साड्यांचा इतिहास सांगणारा ‘साड्यांची दुनिया’ हा कार्यक्रम दीपाली चरेगावकर यांनी सादर केला. महर्षी कर्वे यांचे कार्य आणि संस्थेची माहिती देणारा हेरिटेज वॉक विनिता देशपांडे यांनी घेतला. तंजावरच्या बृहदीश्वर मंदिराची माहिती देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामधे भरतनाट्यम् नृत्यातून सम्राट राजराजा चोल यांचे कार्य आणि बृहदीश्वर मंदिराचे महत्त्व सांगितले गेले. या कार्यक्रमाची संकल्पना आणि लेखन डॉ. भाग्यश्री पाटसकर यांचे तर भरतनाट्यम् सादरीकरण मधुरा हुबळीकर यांचे होते. सूत्रसंचालन मोनाली झेंडे यांनी केले तर पूजा दरेकर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com