दौंड- अजमेर एक्स्प्रेस व्हाया पुणे धावणार

दौंड- अजमेर एक्स्प्रेस व्हाया पुणे धावणार

पुणे, ता. २९ ः प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाने उन्हाळी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दौंड-अजमेर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष रेल्वे २९ एप्रिल ते १ जुलै दरम्यान दर सोमवारी दौंडहून रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजून ३५ मिनिटांनी अजमेरला पोहचेल.
अजमेर - दौंड साप्ताहिक विशेष रेल्वे २८ एप्रिल ते ३० जून दरम्यान दर रविवारी अजमेरहून रात्री ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल, दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी दौंडला पोहचेल. गाडीला पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, बोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, गोध्रा, दाहोद, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोडगड, चंदेरिया, भिलवाडा, विजयनगर आणि नसिराबाद आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com