दरोड्याच्या तयारीतील
तीन तरुणांना अटक

दरोड्याच्या तयारीतील तीन तरुणांना अटक

पुणे, ता. ८ : कात्रज भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार कोयते, मिरची पावडर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पवन रवींद्र महादेवकोळी (वय २३, रा. म्हसेचाळ, कात्रज), योगेश अनिल शिंदे (वय १९, मु. परांडा, जि. धाराशिव) आणि भालचंद्र रवींद्र महादेवकोळी (वय १९) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार पसार झाले. मनोज महादेव पांडव (वय २०, रा. संतोषनगर, कात्रज) आणि यश घोडके (रा. कात्रज) अशी त्यांची नावे असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हवालदार नामदेव रेणुसे यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
कात्रज परिसरातील आगम मंदिरासमोर अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आरोपी थांबले होते. ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आरोपींना पकडले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com