आयुष मंत्रालयाच्या उपक्रमांची सांगता

आयुष मंत्रालयाच्या
उपक्रमांची सांगता
Published on: 

पुणे, ता. १७ : नवनिर्वाचित केंद्र सरकारच्या अंतर्गत आयुष मंत्रालयाने सुरू केलेल्या पहिला १०० दिवसीय उपक्रमाची सांगता झाल्याची माहिती क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानचे प्रभारी डॉ. अरुण गुरव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या वेळी जिल्हा परिषदचे आयुष अधिकारी मिलिंद चिद्रावार, सहाय्यक संचालक क्षेत्रीय कार्यालय डॉ. अनिता कोल्हे, संधिवात तज्ज्ञ डॉ. अरविंद चोपडा उपस्थित होते.

गुरव म्हणाले की, जनजागृती आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने ‘हर घर आयुर्योग’ मोहीम आणि ‘भारताची प्रकृती परीक्षा मोहीम’ सुरू केली. शंभर दिवसीय उपक्रमात मोफत आरोग्य तपासणी, समुपदेशन, आयुष थेरपी आणि चिकित्सा मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली, तसेच जागतिक आरोग्य संघटना, व्हिएतनाम आणि मलेशियासोबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती गुरव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.