जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे शिक्षकांनी मांडले गाऱ्हाणे

जिल्हा परिषदेच्या सीईओंकडे शिक्षकांनी मांडले गाऱ्हाणे
Published on: 

पुणे, ता. १७ : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची भेट घेत त्यांचे गाऱ्हाणे मांडले. त्यांच्या दुर्गम भागात बदल्या करण्यात आल्या असून, ते कसे गैरसोईचे ठरत आहे, याबाबत समस्यांचा पाढाच शिक्षकांनी पाटील यांच्यासमोर वाचला. काही दिव्यांग शिक्षकांना देखील दूरच्या शाळा मिळाल्याने त्यांची गैरसोय होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर याबाबत सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल, सध्या आचारसंहिता असल्याने विधानसभा निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. मागील काही दिवसांपासून शिक्षक हे दररोज जिल्हा परिषदेत बदलीसाठी हेलपाटे मारत होते. त्यांचे म्हणणे कुणीच ऐकून घेत नसल्याच्या तक्रारी देखील त्यांनी केल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.