

पुणे, ता. १६ : जिल्ह्यातील साडेसहा हजार महिलांना तीन महिने मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून त्यांना हे सिलिंडर दिले जाणार आहेत. त्यासाठी आणखी दोन हजार लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे.
एका महिन्यामध्ये एका सिलिंडरचा लाभ महिलांना मिळणार असून, अनुदानाचे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. या योजनेसाठी पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थी तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीही अन्नपूर्णा योजनेतून पात्र होणार आहेत. उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना ५३० तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ८३० रुपये अनुदान थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडरचे नियमित वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. त्यानुसारच अन्नपूर्णा योजनेतून देण्यात येणाऱ्या तीन मोफत सिलिंडरचे वितरणही तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. एका कुटुंबात (रेशनकार्डनुसार) केवळ एक लाभार्थी या योजनेत पात्र असेल. उज्ज्वला योजनेंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलिंडरची बाजारभावाची पूर्ण रक्कम ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र सरकारकडून अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्याचधर्तीवर तेल कंपन्यांना राज्य सरकारकडून दिले जाणारे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.
राज्य सरकारकडून लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी तालुका स्तरावर करण्यात आली असून जिल्ह्यात सहा हजार ३९० महिला पात्र ठरल्या आहेत. तर आणखी एक हजार ९१९ लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून पडताळणीचे काम सुरू आहे.
- महेश सुधळकर,
जिल्हा पुरवठा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.