

सनील गाडेकर ः सकाळ वृत्तसेवा
अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्याला माणुसकीचा आधार घेत नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक कायदा थोडा लवचिक आहे. ‘वैद्यकीय पुनर्वसन’ याचा न्यायालय प्रामुख्याने विचार करते. याउलट अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांसाठी कठोर शिक्षा आहे. शिक्षेचा कालावधी किती मुद्देमाल सापडला यावर अवलंबून असून कमी प्रमाणात असेल तर एक वर्षाची शिक्षा, तसेच १० हजार रुपये दंड आहे. मध्यम प्रमाणात असेल तर १० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व एक लाख रुपये दंडाचे स्वरूप आहे.
अमली पदार्थ जास्त प्रमाणात सापडला असेल तर २० वर्षांची शिक्षा व दोन लाख रुपये दंड, तसेच सदोष मनुष्यवधाच्या समकक्ष हा गुन्हा आहे. जर असा गुन्हा करणारी व्यक्ती १८ वर्षांखालील असेल आणि असे काम करण्यासाठी जर त्याचा वापर केला असेल तर त्याला दिलेली शिक्षा ही आयुष्य उद्ध्वस्त करणारी असते. त्यामुळे १८ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्यांना शिक्षा लागू होत नाही. कधी कधी अशी मुले नकळतपणे यात फसतात, अशी निष्पाप मुले न्यायालयात लगेच ओळखली जातात व त्यांची सुटकादेखील करण्यात येते. ज्या व्यक्ती अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत, त्यांचे पुनर्वसन केले जाते, अशी माहिती जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेल्या वकील आरती जोशी यांनी दिली.
कोण कारवार्इ होऊ शकते?
केंद्र सरकारचे विशेष अधिकारी, पोलिस अधिकारी, केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ), रेल्वे पोलिस, पॅरा मिलिटरी फोर्सेस, महसूल विभाग, पोलिस शिपाई, कॉन्स्टेबल रँकच्या वरचा कुठलाही अधिकारी, गॅझेटेड अधिकारी या गुन्ह्याचा तपास करू शकतात. तसेच न्यायाधीशांच्या परवानगीने वॉरंट काढून धाड घालणे, सर्च करणे, जप्तीची कारवार्इ, अटक करणे, गोदामावर छापा मारणे, अटक व्यक्तीला घेऊन जाणे, कोठडीत ठेवणे, पाठलाग करून पकडणे, टोळीचा मागोवा घेणे, समन्स बजावणे, वॉरंट बजावणे इत्यादी कार्यवाही करू शकतात.
कृत्य व शिक्षा
अमली पदार्थ वापरणे – अमली पदार्थाचे किती आहे त्यावर शिक्षा ठरते. सहा महिन्यांपासून पुढे तसेच दोन लाखांपासून पुढे दंड
पदार्थ बाळगणे - १० ते २० वर्षे तुरुंगवास व १ लाख रुपयांच्या पुढे दंड
वाहतूक करणे - १० ते २० वर्षे तुरुंगवास व १ लाख रुपयांच्या पुढे दंड
शेती करणे - १० ते २० वर्षे तुरुंगवास व १ ते २ लाख रुपये दंड
व्यवसायासाठी शेतीसाठी आर्थिक मदत करणे - १० ते २० वर्षे तुरुंगवास व १ ते २ लाख रुपये दंड
देशातून आणणे किंवा पाठविणे - १० ते २० वर्षे तुरुंगवास व १ ते २ लाख रुपये दंड
गोडाऊनमध्ये साठा करणे - १० ते २० वर्षे तुरुंगवास व १ ते २ लाख रुपये दंड
(सोर्स - लिगा ज्युरीस लॉ फर्म)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.