‘यूजीसी-नेट’ परीक्षेचा निकाल जाहीर

‘यूजीसी-नेट’ परीक्षेचा
निकाल जाहीर
Published on: 

पुणे, ता. १७ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा (नेट) निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत एक लाख १२ हजार ७० विद्यार्थी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी, तर ५३ हजार ६९४ विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी पात्र ठरले आहेत.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत देशात ‘यूजीसी-नेट जून २०२४’ ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने २१ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आली. देशातील २८० शहरांमध्ये ८३ विषयांसाठी ही परीक्षा झाली. परीक्षेसाठी ११ लाख २१ हजार २२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी सहा लाख ८४ हजार २२४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यंदा ५९ तृतीयपंथी विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या परीक्षेतून चार हजार ९७० विद्यार्थी ज्युनिअर रिसर्च फेलोशिपसाठी (जेआरएफ) पात्र ठरले आहेत.

यूजीसी-नेट’ परीक्षेसाठी नोंदणी
४,८५,५७८
- विद्यार्थी

६,३५,५८८
- विद्यार्थिनी

५९
- तृतीयपंथी

६,८४,२२४
- एकूण


निकालाचा तपशील
६,८४,२२४
- परीक्षा दिलेले विद्यार्थी

४,९७०
- ‘जेआरएफ’साठी पात्र

५३,६९४
- ‘सहाय्यक प्राध्यापक’ होण्यासाठी पात्र


१,१२,०७०
- ‘पीएच.डी’साठी पात्र

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : https://ugcnet.nta.ac.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.