आवडत्या विषयात करिअर करा

आवडत्या विषयात करिअर करा
Published on

पुणे, ता. १ : ‘‘पारंपरिक अभ्यासक्रम न निवडता, आपल्या आवडत्या विषयात करिअर करा. ज्यांनी संस्कार केले, शिक्षण दिले, त्यांचा विसर पडू देऊ नका,’’ असा सल्ला ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिला. स्वभाषेचे महत्त्व जपण्याचे आवाहन करत सोलापूरकर यांनी स्वभाषा उत्तम आल्याशिवाय दुसरी भाषा शिकता येत नाही. त्यामुळे वाचन वाढवा, वृत्तपत्रे वाचा आणि आपला इतिहास पुस्तकांतून जाणून घ्या, असेही सांगितले.
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्राच्या वतीने वसतिगृहनिहाय घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहातील मोडक सभागृहात सोलापूरकर यांच्या हस्ते झाले. प्रथम तीन विजेत्यांचा स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमासाठीचा प्रथम क्रमांक सिंहगड गटाला देण्यात आला. याशिवाय पाचही वसतिगृहांतील व्यवस्थापन टिमचा गौरव करण्यात आला. जपानमधील कंपन्यांमध्ये नोकरी मिळालेल्या समितीच्या तीन विद्यार्थ्यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. समितीचे कार्यकारी विश्‍वस्त तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थिनी स्नेहल कुलकर्णीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. या वेळी विश्‍वस्त डॉ. ज्योती गोगटे, विनया ठोंबरे, संजय अमृते, कार्यकर्ते, सीमा होस्कोटे, रवींद्र नामजोशी, राजेंद्र ततार, हरीश अष्टेकर, निसार चौगुले, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह सर्व वसतिगृहांचे पर्यवेक्षक उपस्थित होते. प्राजक्ता क्षीरसागर व ओंकार शिंदे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com