आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

आरटीओच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

पुणे, ता. ४ : दिवे येथे आरटीओ प्रशासन जड वाहनांच्या पासिंगचे काम करते. मात्र योग्यता प्रमाणपत्राच्या नावाखाली आरटीओचे निरीक्षक प्रत्येक वाहनाकडून तीन हजार व ओव्हरलोड वाहन असेल तर चार हजार रुपयांची लाच घेतात. गेल्या अनेक दिवसांपासून आरटीओचा हा भ्रष्टाचार सुरू आहे. येत्या चार दिवसांत हा प्रकार थांबला नाही तर या विरोधात न्यायालयात जाऊ, तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्टाईलने याला उत्तर देणार असल्याचा इशारा युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष सनी गवते यांनी आरटीओ प्रशासनाला दिला. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी) संजीव भोर यांना तक्रारीचे निवेदन देण्यात आले.
दिवे येथील कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल अनेक सामाजिक संघटनांनी तक्रार केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या वेळी प्रसाद जठार, देविका घोसरे, सागर दळवी, सागर गायकवाड, सोनू पाटील, बाबासाहेब कोरे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com