एमआयटी एडीटीतर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

एमआयटी एडीटीतर्फे सागररत्न पुरस्कारांचे वितरण

पुणे, ता. ४ : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची महाराष्ट्र अकादमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग(मॅनेट) आणि द नेव्हल कनेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘फ्यूचर स्किल्स मेरीटाइम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘सागररत्न’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कॅप्टन विपन तलवार यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ देण्यात आला.
या दोन दिवसीय कार्यक्रमात आमदार कॅप्टन वेंजी विगास, शिपिंगचे महासंचालक श्याम जगन्नाथन, डॉ. संकल्प शुक्ला, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू डॉ. मंगेश कराड, विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. रामचंद्र पुजेरी, कॅप्टन प्रेरित मिश्रा, डॉ. राजीव काशिकर, डॉ. श्रीकांत गुंजाळ आदी उपस्थित होते.
सागरी क्षेत्रातील अलौकिक कार्यासाठी ‘सागररत्न’ पुरस्कार दिले जातात. यंदा कॅप्टन विपन तलवार(उद्योग क्षेत्र), कॅप्टन पंकज नायक, कॅप्टन चिन्ना रुपाजू आणि कॅप्टन कुणाल कात्याल, कॅप्टन अंशुल राजवंशी(सीएसआर कार्य), कॅप्टन महेंद्र भसीन(सागरी सुरक्षा), कॅप्टन दिनेश जयराम, मनोज गांधी(सागरी उद्योग) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर कॅप्टन डॉ. शशांक जहागीरदार यांना ‘मेरीटाइम पर्सोना ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सागरी क्षेत्रातील महिला सक्षमीकरणासाठी कॅप्टन करण कोचर यांना सन्मानित करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com