मतदारयादीतील नाव
ऑनलाइन शोधा

मतदारयादीतील नाव ऑनलाइन शोधा

पुणे, ता. १० ः मतदार यादीत आपले नाव आहे का नाही? आपले मतदान केंद्र नक्की कोठे आहे? याचा शोध ऐन मतदानाच्या दिवशी आपण घेतो. त्यामुळे काही वेळा अडचणींचा सामना करावा लागतो. तर अनेकदा मतदान केंद्र माहीत नसल्यास मनस्तापही सहन करावा लागतो. म्हणूनच मतदानापूर्वी ऑनलाइन पद्धतीने आपले नाव मतदार यादीत शोधणे शक्य झाले आहे. चला तर मग शोधूया आपले नाव...

- गुगलवर जाऊन https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर क्लिक करा.
- तुम्हाला तीन पर्याय दिसतील.
१) पहिल्या पर्यायात ईपीआयसी क्रमांकाद्वारे तुम्हाला नाव शोधता येईल.
२) जर तुम्हाला ईपीआयसी क्रमांक आठवत नसेल तर ‘विवरणाद्वारे शोध’ हा पर्याय निवडता येईल. ज्यामध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव द्यावे लागेल. तुमच्या वयाचा तपशील, राज्य, जिल्हा आणि विधानसभा क्षेत्र भरले की एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होईल.
३) जर तुम्हाला दोन्ही पर्याय जमत नसेल तर मोबाईल क्रमांकाद्वारे तुम्हाला तुमच्या नावाचा शोध घेता येईल. मात्र, यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक मतदानाशी संलग्न असणे आवश्यक आहे.

सर्व तपशील भरल्यानंतर तुम्हाला तुमचे मतदार यादीतील नाव, मतदान केंद्र, कोणत्या दिवशी मतदान आहे. तसेच मतदान संबंधित अधिकाऱ्यांचे नाव आणि मोबाईल क्रमांकही पाहायला मिळतो.


ॲपचाही पर्याय...
भारतीय निवडणूक आयोगाने ऑनलाइन संकेतस्थळाबरोबरच सक्षम ॲपही विकसित करण्यात आले आहे. ज्याद्वारे मतदार आपले नाव, मतदान केंद्र आदी माहिती शोधू शकतात.
संकेतस्थळ ः https://www.eci.gov.in/saksham-app

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com