‘एमपीएससी’च्या उमेदवारांना 
तारखा जाहीर झाल्याने दिलासा

‘एमपीएससी’च्या उमेदवारांना तारखा जाहीर झाल्याने दिलासा

पुणे, ता. १० ः महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) नुकतेच राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि पोलिस उपनिरीक्षक पदाची (पीएसआय) शारीरिक चाचणीच्या तारखा अखेर जाहीर केल्या आहेत. त्यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. इतर प्रलंबीत विषयांतही आयोगाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे.
राज्यसेवा पूर्व परीक्षा येत्या सहा जुलै रोजी होईल. या परीक्षेसाठी घोषित करण्यात आलेल्या जागांमध्येही वाढ करण्यात आली आहे. ‘एसईबीसी’ उमेदवारांसाठी अर्ज करण्याची सुविधा देण्यात आली आहे. वयोमर्यादा उलटलेल्या (वयाधिक्य) अर्ज भरू न शकलेल्या उमेदवारांनाही संधी मिळाली आहे.
पीएसआय २०२२ परीक्षेची शारीरीक चाचणी दोन वर्षांपासून अनेक कारणांमुळे प्रलंबीत होती. नवीन तारीख जाहीर होत नसल्यामुळे उमेदवार चिंतेत होते. अखेरीस पोलिस महासंचालक कार्यालयाने सहमती दर्शविल्यानंतर २४ मे ते ६ जून दरम्यान ही चाचणी पार पडणार आहे. आयोगाने सविस्तर कार्यक्रम संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

राज्यसेवेच्या जागांत वाढ ः
एमपीएससीतर्फे या पूर्वी २७४ पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार होती. त्यामध्ये आता २५० जागांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ५२४ पदांसाठी परीक्षा होईल. उमेदवारांना २४ मे पर्यंत या कालावधीत अर्ज करता येतील. सुधारित जाहिरातीनुसार उपजिल्हाधिकारी पदासाठी एकूण सात पदे, सहाय्यक राज्य कर आयुक्त पदासाठी एकूण ११६ पदे, गटविकास अधिकारी पदासाठी ५२ पदे आदींचा समावेश आहे.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com