डॉ. दाभोलकर निकाल प्रतिक्रीया

डॉ. दाभोलकर निकाल प्रतिक्रीया

आमच्याकडे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याविरोधात पुरावे होते. कोल्हापूर येथील व्यावसायिक संजय साडविलकर यांनी तावडेविरुद्ध साक्ष दिली होती. आम्ही या निकालाचे स्वागत करतो. निकालाची प्रत मिळाल्यावर उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात येईल.
- प्रकाश सूर्यवंशी, ‘सीबीआय’चे वकील

जे घडले ते दुर्दैवीच आहे. मात्र त्या गुन्ह्यात कुणालाही दोषी ठरविता येणार नाही. आम्ही हत्येचे समर्थन करणारे युक्तिवाद केले नाहीत. पण न्यायालयाला तसे वाटले असेल. आम्ही त्याचा आदर करतो. वेळोवेळी आरोपी बदलविण्यात आले. प्रत्यक्ष साक्षीदारांच्या आधारावर ही शिक्षा दिली गेली. ती ग्राह्य धरू नये असा आमचा युक्तिवाद होता. अंदुरे आणि कळसकर यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.
- ॲड. प्रकाश साळसिंगीकर, बचाव पक्षाचे वकील

आम्हाला ११ वर्षांनंतर न्याय मिळाला याचा आनंद आहे. निर्दोष सुटलेल्या आरोपींच्याबाबत झालेल्या निकालाबाबत आम्ही उच्च न्यायालयात अपील करणार आहोत. डॉ. तावडे विरोधातील पुरावे आम्ही सादर केलेले आहेत.
- ॲड. ओंकार नेवगी, दाभोलकर कुटुंबीयांचे वकील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com