शिख समाजाची
काँग्रेस भवनात बैठक

शिख समाजाची काँग्रेस भवनात बैठक

पुणे, ता. १० : शहरातील शिख समाजातील प्रमुख व्यक्तींची बैठक काँग्रेस भवनात पार पडली. गणेशपेठ गुरुद्वाराचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, रणजितसिंग अरोरा, रमिंदरसिंग राजपाल, युथ गुरुनानक फाउंडेशन अध्यक्ष गुरवेंदरसिंग राजपाल,ह्यूमन राईटसचे ललितसिंग डीडी यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
 
संविधान संरक्षण आणि अल्पसंख्याक समाजाला आधार हे दोन्ही मुद्दे महत्त्वाचे असून त्यामुळेच धंगेकर यांना सहकार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे भोलासिंग अरोरा यांनी सांगितले. यावेळी सुरेंदरसिंग गुरुदत्ता, गुरप्रीतसिंग शर्मा, सनीसिंग व्होरा, विरमितसिंग मैनी, बच्चनसिंग कल्याणी, आझादसिंग बच्चूसिंग टाक, नवनीतसिंग गांधी, नागपूरचे आमदार अभिजित वंजारी, मुकुंद किर्दत, गोपाळ तिवारी, अजित अभ्यंकर, संदीप बर्वे आणि रेश्मा, प्रीती चढ्ढा व सुखमित कौर अरोरा, सुरिंदरसिंग राजपाल आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com