कुरुलकरांवर देशद्रोहाचा 
गुन्हा कधी दाखल होणार?

कुरुलकरांवर देशद्रोहाचा गुन्हा कधी दाखल होणार?

पुणे, ता. ११ : ‘‘डीआरडीओचे माजी संचालक प्रदीप कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेसंदर्भातील महत्त्वाची व अत्यंत गोपनीय असलेली माहिती पाकिस्तानला पुरवली असल्याचे उघड झाले. त्यांना तुरुंगवास झाला असला तरीही अद्याप त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेला नाही. कुरुलकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा कधी दाखल करणार?’’, असा प्रश्न काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सरकारला विचारला आहे.
काँग्रेस नेत्या इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. अशा काँग्रेसचा यंदाच्या निवडणुकीत जर विजय झाला तर पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव साजरा होईल, अशा जाहिराती भाजपकडून केल्या जात आहेत. या हास्यस्पद जाहिराती आहेत. काँग्रेसचा ओढा पाकिस्तानकडे असल्याचा आरोप केला जातो, मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. ‘मोदी प्रणीत भाजपचा’ पाकिस्तानकडे ओढा असल्याचा आरोप गोपाळ तिवारी यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com