गद्दार, खुद्दार म्हणून मते मिळत नाहीत

गद्दार, खुद्दार म्हणून मते मिळत नाहीत

पुणे, ता. ११ : “लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील, असे नॅरेटिव्ह विरोधक सेट करू पाहत आहेत. मात्र तसे करून निवडणूक जिंकता येत नाही. मतदारांना विकासाची कामे सांगावी लागतात. विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट करावा लागतो. फक्त गद्दार आणि खुद्दार म्हणत मते मिळत नाहीत,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते. या वेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर आणि सरचिटणीस सुकृत मोकाशी व्यासपीठावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, “देशातील सुजाण नागरिकांना पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकासकामांची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे महायुतीला देशात बहुमत मिळेल, असा विश्वास आहे. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे या निवडणुकीत ‘नरेटिव्ह’ (वातावरण) सेट करत आहेत. त्यांच्या भाषणांमधून विकासाचा दृष्टिकोन सांगितला जात नाही. त्यामुळे राज्यात बहुसंख्य जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जातो. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंतची निवडणूक व्यवस्थित झाली आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षित जागा निश्चितच मिळतील.”

पुण्याकडे सर्वांचे लक्ष ः फडणवीस
- पुण्याने तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडी घेतली असून उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर
- सर्वसामान्यांना काय मिळणार, त्याच्या स्वप्नपूर्ती कोणते धोरण असणार याचा विचार करून विकासाकडे पाहिले पाहिजे.
- शहरीकरणाचे नियोजन केले आहे. यापूर्वीच्या सरकारने शहर नियोजनाकडे दुर्लक्ष केले.
- रिंगरोड, मेट्रो यातून सार्वजनिक वाहतुकीला गती दिली जात आहे.
- नाशिक आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘डबल डेकर’ रस्ते पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन
- शहरातील पाणीपुरवठा, विमानतळ, नदी सुधार अशी विकासाची दृष्टी घेऊन पुढे जात आहोत

मोदींच्या ‘ऑफर’वर फडणवीसांचे भाष्य
पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना महायुतीत सहभागी होण्याची ‘ऑफर’ दिली. याबद्दल फडणवीस म्हणाले, “मोदींनी पवारांना ‘ऑफर’ नाही तर सल्ला दिला. बारामतीत महायुतीचा उमेदवार निवडून येत असल्याचे दिसल्यानंतर पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे विधान केले. त्यामुळे मोदी यांनी सल्ला दिला की, पवारांनी अजित पवारांकडे यावे आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जावे. कारण काँग्रेस ही बुडणारी नौका आहे. ते तुम्हाला वाचवू शकत नाहीत. महायुतीमध्ये आल्यानंतरच तुमची राजकीय स्वप्न पूर्ण होतील. ती ‘ऑफर’ नव्हती.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com