प्रवेश परीक्षा अर्जासाठी पुणे विद्यापीठाकडून २० मेपर्यंत मुदतवाढ

प्रवेश परीक्षा अर्जासाठी पुणे विद्यापीठाकडून २० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे, ता. ११ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागांतील पदवी, पदव्युत्तर आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेचा ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २० एप्रिलपासून सुरू झालेल्या या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविल्याने विद्यार्थ्यांना आता २० मेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

विद्यापीठातील विविध विभाग, केंद्र आणि प्रशाळांमध्ये विविध पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम राबविले जातात. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा अनिवार्य आहे. ऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षेच्या अर्जाची याआधी १० मेपर्यंत मुदत होती, आता ही मुदत २० मेपर्यंत वाढवली आहे. विद्यापीठाच्यावतीने पदवी प्रवेशासाठी १३ जूनला, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १४ ते १६ जून या दरम्यान ऑनलाइन प्रवेश परीक्षा होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी इयत्ता बारावी उत्तीर्ण केलेली असावी. तर पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान आवश्यक गुणांसह पदवी धारण केलेली असावी, असे पात्रतेचे निकष आहेत.
प्रवेश प्रक्रियेबाबत https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या संकेतस्थळावर अधिक माहिती देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com