डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प

डिजिटल मार्केटिंग बूट कॅम्प

पुणे, ता. १२ : रिअल इस्टेट एजंटसाठी डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये शिकविणारा विशेष बूटकॅम्प २० मे रोजी सुरु होणार आहे. डिजिटल मार्केटिंगमुळे कमीत कमी गुंतवणुकीत, ठराविक ग्राहक वर्गापर्यंत अचूकपणे पोहोचता येते. रिअल इस्टेट क्षेत्रात तर ‘मार्केटिंग’चे अधिकच महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय ऑनलाइन बूट कॅम्प आयोजिला आहे. यामध्ये सर्च, डिस्प्ले, रीमार्केटिंग, युट्युब, सोशल मीडिया, लीड जनरेशन, कन्व्हर्जन, पेज लाइक इत्यादी कॅम्पेन कसे चालवावे, लिंक्डडीन, कॅन्व्हा, चॅटजीपीटी यांचा डिजिटल मार्केटिंगमध्ये कसा उपयोग करावा, याची माहिती दिली जाणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७५

लँडस्केप डिझाईनिंग
ऑनलाइन अभ्यासक्रम
‘लँडस्केप प्लॅनिंग व डिझायनिंग बाबतचा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम शनिवारपासून (ता. १८) सुरु होत आहे. अभ्यासक्रमात झाडे, झुडुपे, वेलींचा लँडस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर, मियावाकी प्लांटेशन पद्धतीचे महत्त्व, रस्ते, उद्याने, मोकळ्या जागेत लँडस्केप नियोजन, बांधकाम रचना, नियोजन, साइट प्लॅनिंग व प्रोजेक्ट डिझायनिंग, ऑटोकॅड सॉफ्टवेअर, पर्यावरणीय आणि कायदेशीर पैलू, जैवविविधता व तेथील प्लांटेशनचे नियम इ. विषयांचा समावेश आहे. लेखीबरोबरच प्रात्यक्षिक अनुभवासाठी विविध रचनेच्या उद्यानांना, साइट प्रोजेक्टला फिल्ड व्हिजिट असणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६

प्रमाणपत्र मिळवून बना
महारेरा नोंदणीकृत एजंट
महारेराने नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण हे दोन्ही बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. हे टाळायचे असेल व नोंदणीकृत रेरा एजंट व्हायचे असेल तर २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक आहे. प्रशिक्षणाची ऑनलाइन बॅच सोमवारपासून (ता. १२) व ऑफलाइन बॅच २० मेपासून सुरु होत आहे.
संपर्क : ९१३००७०१३२

जर्मन भाषा लेव्हल
एक अभ्यासक्रम
जर्मनी ही युरोपची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असे अनेक आंतरराष्ट्रीय ब्रँड आणि कॉर्पोरेशन हे जर्मन आहेत. भारत ही त्यांची वाढती बाजारपेठ असल्याने जर्मन भाषा अनुवादक, जर्मन दुभाषी आणि जर्मन प्रशिक्षकांना भारतात मागणी राहणार आहे. जर्मन शिकल्याने रेझ्युमला वजन प्राप्त होते आणि नोकरीच्या बाजारपेठेतील रोजगार क्षमता वाढते. या सर्व संधींचा लाभ घेण्यासाठी जर्मन भाषा शिकणे महत्त्वाचे आहे. जर्मन भाषेचा ६० तासांचा (लेव्हल ए-१) प्रमाणपत्र अभ्यासक्रम बुधवारपासून (ता. १५) सुरु होत आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६

औषधी वनस्पती
लागवड व प्रक्रिया उद्योग
आयुर्वेदिक व सेंद्रिय उत्पादनांना ग्राहकांकडून मागणी जास्त असल्याने औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीची गरज वाढली आहे. या पार्श्वभूमीवर वनौषधींची लागवड पद्धती व त्यांच्या प्रक्रिया उद्योगाविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा रविवारी (ता. १९) आयोजिली आहे. यामध्ये औषधी वनस्पतींच्या लागवडीचे महत्त्व आणि व्याप्ती, वनौषधी व सुगंधी वनस्पतींचे शेतजमिनीला होणारे फायदे, वनस्पती लागवडीचे तंत्र, नर्सरीचे तंत्र, व्यावसायिकदृष्ट्या लागवडीच्या पद्धती, लागवड व प्रक्रिया उद्योगासाठीच्या सरकारी योजना, मार्केटिंगसाठी असणारा वाव आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. औषधी वनस्पतींच्या उद्यानात जाऊन वनस्पतींविषयी माहिती करून दिली जाणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com