वसुधा परांजपे लिखित ‘नंदादीपातील ज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन

वसुधा परांजपे लिखित ‘नंदादीपातील ज्योती’ पुस्तकाचे प्रकाशन

‘नंदादीपातील ज्योती’
पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. १२ : वसुधा परांजपे लिखित आणि स्नेहल प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘नंदादीपातील ज्योती’ या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते नुकतेच झाले. सदाशिव पेठेतील राणी लक्ष्मी मंडळात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लेखक डॉ. न. म. जोशी, ‘स्नेहल प्रकाशन’चे संचालक रवींद्र घाटपांडे, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल शरदचंद्र पाटणकर, शुभांगी पाटणकर, राणी लक्ष्मी मंडळाच्या ज्येष्ठ विश्वस्त सुधा खाडिलकर, अध्यक्ष मीना कुलकर्णी उपस्थित होते. डॉ. दातार म्हणाल्या , ‘‘प्रेयसाकडून श्रेयसाकडे घेऊन जाणारे आत्मज्ञान या पुस्तकातून आपल्याला पानोपानी मिळते. हे पुस्तक आजच्या काळात दीपस्तंभ ठरेल.’’ नंदिनी सरदेशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. नीता साठे यांनी आभार मानले.
----
बुधवार-गुरुवारी रंगणार
आदिवासी लघु-चित्रपट महोत्सव
पुणे, ता. १२ : बहुरंग संस्थेतर्फे बुधवार (ता. १५) आणि गुरुवारी (ता. १६) सतराव्या आंतरराष्ट्रीय आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासींची सामाजिक, सांस्कृतिक वैशिष्ट्ये, वेगळेपणा, त्यांची बोलीभाषा, जीवनशैली, रूढी-परंपरा, कला या गोष्टी रसिकांना समजाव्यात, या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक केदारी यांनी दिली. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात आयोजित महोत्सवाचे उद्‍घाटन बुधवारी सायंकाळी पाच वाजता मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते होणार आहे. तर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. या महोत्सवात मराठी, हिंदी, तमीळ आणि इंग्रजी भाषेतील सहा लघुपट आणि एक चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळेल. महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com