मतदान करणाऱ्यांना ग्राहकपेठेत  
सकाळी मोफत चहापान

मतदान करणाऱ्यांना ग्राहकपेठेत सकाळी मोफत चहापान

पुणे, ता. १२ : सकाळी लवकर मतदान करणाऱ्याला ग्राहकपेठेत मोफत चहा मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी सोमवारी (ता. १३) ‘सकाळी लवकर मतदान करा अन चहाला ग्राहकपेठेत या’, असे आवाहन ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी केले आहे.
ग्राहकपेठ आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीतर्फे यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान जागृती केली जात आहे. सोमवारी मतदान करून आलेल्या मतदारांना त्यांच्या बोटाची शाई बघून ग्राहक पेठेच्या कट्ट्यावर चहा व क्रिमरोल देण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सकाळी साडेसात ते साडेदहा वाजेपर्यंत ग्राहकपेठेचा हा उपक्रम सुरू राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com