प्रकल्प प्रलंबित मार्गी लावा

प्रकल्प प्रलंबित मार्गी लावा

शहर व परिसराच्या पायाभूत सुविधांचे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रलंबित आहेत. ते गतीने आणि वेळेत मार्गी लावण्याची जबाबदारी भावी खासदारांची आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून आवश्‍यक त्या परवानग्या आणि निधी मंजूर करून त्यांनी भर दिला पाहिजे. भविष्यातील गरज ओळखून शहरातील तज्ञ्जांची मदत घेऊन काम केले पाहिजे.
- रामचंद्र गोहाड (माजी नगररचना संचालक)

पुरंदर, पुणे-नाशिक रेल्वे, लोणावळा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण, रिंगरोड आदी वाहतूक संदर्भातील रखडलेले प्रकल्प वेळेत मार्गी लावणे अपेक्षित आहे. निवडणूक येणाऱ्या खासदाराने त्यासाठीचा पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. जेणेकरून या शहराची कनेक्टिव्हीटी कशी वाढेल आणि वाहतूक कोंडीतून शहराची सुटका कशी होईल, यासाठी काम करणे अपेक्षित आहे.
- विवेक वेलणकर (सजग नागरिक मंच)

कोरोनाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. तो विचारात घेतला, तर शहरातील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाला गती देण्याची गरज आहे. अन्य खासगी जागेप्रमाणेच पुणे शहरात रेल्वे आणि संरक्षण खात्याच्या जागेवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासाचा मोठा प्रश्‍न आहे. तो केंद्र सरकारच्या मदतीने मार्गी लागू शकतो. त्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्टीधारकांसाठी अनुदानित योजना पुन्हा सुरू करणे गरजेचे आहे, असे मला वाटते.
- संदीप महाजन (वास्तू विशारद)

विकास करताना पर्यावरणाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मानवाच्या जीवनाशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. जसा आपला अधिवास असतो, तसाच प्राण्यांचा, पक्षांचा, झाडांचाही अधिवास असतो, त्याचा विचार विकासाच्या नियोजनात असला पाहिजे.
- डॉ. श्रीनाथ कवाडे (पर्यावरण तज्ज्ञ)

विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आजही केंद्रीय विद्यापीठ किंवा आयआयटीसारखी संस्था नाही. सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची एक वेगळी ओळख असून डेक्कन कॉलेजसारख्या नामवंत संस्थेचे राष्ट्रीय विद्यापीठात रूपांतर होऊ शकते. बालेवाडीत क्रीडा विद्यापीठ प्रलंबित असून खासदारांनी दिल्लीत याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
- डॉ. भूषण पटवर्धन (माजी उपाध्यक्ष, यूजीसी )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com