वोट कर पुणेकर

वोट कर पुणेकर

पुणे, ता. १३ : प्रथमच बोटावर लागलेल्या मतदानाच्या शाईचा आनंद तर कुठे सहकुटुंब मतदान केल्याची आठवण... पुणेकरांनी प्रत्यक्ष मतदानाबरोबरच समाजमाध्यमांवर विधायक पोस्ट करत लोकशाहीचा उत्सव साजरा केला. समाजमाध्यमांवर जवळपास प्रत्येकानेच मतदानाचे आव्हान केल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे ‘वोट कर पुणेकर’ हा हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये पाहायला मिळाला.

सोमवारी सकाळपासूनच पुणेकरांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. तेव्हापासूनच समाज माध्यमांवर ‘पुणे लोकसभा’, ‘वोट कर पुणेकर’, ‘पुणेकर’ आदी हॅशटॅग ट्रेंडींगमध्ये होते. युवा वर्गाने मतदानानंतर समाजमाध्यमावर हमखास पोस्ट केली आहे. ज्यामध्ये बोटाला लागलेली शाई किंवा कुटुंबासोबत असलेला फोटो ‘शेअर’ केला आहे. त्याचवेळी पुणेकरांना मतदानाचे आवाहनही करण्यात आले. शहरातील कलाकार, राजकीय नेते, शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी आदींनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत निवडणूक आयोगाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. एकीकडे मतदानाचा आनंद होता तर दुसरीकडे मतदार यादीत नाव नसल्याचा संतापही अनेकांनी व्यक्त केला आहे.

मीम्सचा पाऊस..
‘वसंत काय खाणार, धंगेकरांची मते’, ‘पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर’, ‘काय म्हणतात पुणेकर, निवडून येणार धंगेकर’ अशा मीम्सचाही पाऊस समाज माध्यमांवर पाहायला मिळाला. तीनही उमेदवारांचे समर्थन आणि मिश्कीलपणे टिप्पणी करणाऱ्या पोस्टनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. तर दुसरीकडे ‘दुपारी एक ते चार मतदान सुरू आहे’ अशा पुणेरी पाट्याही समाजमाध्यमांवर पाहायला मिळाल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com