बारामती गोदामाची लाइट बंद

बारामती गोदामाची लाइट बंद

पुणे, ता. १३ : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य बंद असलेल्या ईव्हीएम मशिन कोरेगाव पार्क येथील धान्य गोदामात ठेवण्यात आल्या आहेत. या गोदामातील सीसीटीव्ही सोमवारी (ता. १३) काही वेळ बंद असल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तक्रार करण्यात आली.
बारामती मतदारसंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान पार पडले. कोरेगाव पार्क येथील गोदामात स्ट्रॉगरूम तयार करून तेथे ईव्हीएम मशिन ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक निरिक्षक यांच्या देखरेखीखाली आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या रूम बुधवारी (ता. ८) सील करण्यात आल्या. याठिकाणी जिल्हा प्रशासनाने सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली आहे. तीन स्तरीय पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. याशिवाय स्ट्रॉगरूमच्या बाहेरच्या परिसरात पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

त्या ठिकाणी इलेक्ट्रिशियनकडून काम सुरु असल्याने अल्प कालावधीसाठी एक केबल काढली होती. त्यामुळे टीव्हीवर त्याचे चित्रण दिसत नव्हते. मात्र, सर्व सीसीटीव्ही चालू असून, त्या कालावधीचा डेटा उपलब्ध आहे. सर्व सीसीटीव्हीचे प्रक्षेपण सुरु असून, कोणतीही अडचण नाही. याची सविस्तर चौकशी केली जाईल.
कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी, बारामती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com