सस्नेह भजनी मंडळाचा
सुवर्ण महोत्सव साजरा

सस्नेह भजनी मंडळाचा सुवर्ण महोत्सव साजरा

पुणे, ता. १४ : सस्नेह भजनी मंडळाचा सुवर्ण महोत्सव समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. नितीन महाबळेश्वरकर आणि सहकाऱ्यांच्या पंचपदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. स्तोत्र पठणाने सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. सदस्यांनी भजन, अभंग गायन, नाट्यगीत, गवळण असे प्रकार सादर केले. संस्थापक सदस्य विनायक पंढरपुरे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या वाटचालीचा आढावा घेतला. गायत्री ओलतिकर, मैत्रेय जोशी, धरित्री चिंधडे, गंधाली देशपांडे यांनी गीत सादर केले. ओंकार देशपांडे आणि ओंकार पुरकर यांनी अभंग व गवळण सादर केली. सचिन पुरकर (तबला) आणि राहुल वडके (पखवाज) यांनी साथसंगत केली. त्यानंतर मंडळाच्या संस्थापक सदस्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे आयोजन युवा सस्नेह भजनी मंडळातर्फे करण्यात आले. संयोजन प्रकाश पुरकर आणि प्रवीण कुलकर्णी यांनी केले. नीता पुरकर-सातपुते आणि प्रज्ञा महाबळेश्वरकर-गोसावी यांनी निवेदन केले. कार्यक्रमाची सांगता श्रिविधी हरिहर या दत्त स्तवनाने झाली. मयूरी पुरकर-अग्निहोत्री यांनी आभार मानले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com