रूबी हॉल क्लिनिकमध्ये
परिचारिका सप्ताह साजरा

रूबी हॉल क्लिनिकमध्ये परिचारिका सप्ताह साजरा

पुणे, ता. १४ : रूबी हॉल क्लिनिकमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रॅन्ट यांच्या हस्ते आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी, नॅटली ग्रॅन्ट, वैद्यकीय संचालक डॉ. प्रसाद मुगळीकर, कर्नल डेनु थॉमस (निवृत्त) आणि परिचर्या सेवा विभागाच्या संचालक मेजर रंजना विल्यम्स उपस्थित होते.
रंजना विल्यम्स यांनी या वर्षीच्या सप्ताहाची ‘आमच्या परिचारिका, आमचे भविष्य, शुश्रूषेची आर्थिक ताकद’ ही संकल्पना असल्याचे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, ‘‘रुग्णांना पुन्हा सशक्त व्यक्ती बनवण्याची शक्ती परिचारिकांकडे असते. रुग्णांच्या जीवनात आरोग्यदायी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या परिचारिकांच्या अमूल्य योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सप्ताह साजरा केला जातो.’’
या सप्ताहानिमित्त नर्सिंगच्या सर्वोत्तम पद्धतींवर भित्तीचित्र स्पर्धा, शुश्रुषेच्या मूल्यांवर लक्ष केंद्रित करणारे कृती आधारित कार्यक्रम, प्रश्नमंजूषा स्पर्धा, रुग्णांच्या सुरक्षिततेवर स्किट आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com