----------

----------

संगीत अन् चित्रपटप्रेमी
‘सकाळ’ वाचकांना सवलत

पुणे, ता. १४ ः ‘तोच चंद्रमा नभात’, ‘एक धागा सुखाचा’, ‘जिवलगा, कधी रे येशील तू’... यांसह गीतरामायणातील ‘राम जन्मला गं सखे’, ‘पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा’, अशा अजरामर गाण्यांनी मराठीजनांना समृद्ध करणारे प्रतिभावंत संगीतकार म्हणजे सुधीर फडके ऊर्फ बाबूजी. त्यांची यशामागील खडतर संघर्षगाथा नेमकेपणाने उलगडणाऱ्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाला सध्या महाराष्ट्रासह देश-विदेशांतून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. हा नितांतसुंदर चित्रपट पाहण्यासाठी त्याच्या तिकिटांवर आता ‘सकाळ’च्या वाचकांना खास सवलत मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com