Rajni Tribhuvan : माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन

त्रिभुवन यांच्या भावाचे निधन झाल्याने त्या अंत्यदर्शनासाठी विश्रांतवाडी येथे त्यांच्या भावाच्या घरी गेल्या होत्या.
Rajni Tribhuvan
Rajni Tribhuvan SAkal
Published on

Pune News : पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज (ता. १५) सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर कैलास स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (pune former mayor rajni tribhuvan passed away)

त्रिभुवन यांच्या पश्‍चात पती, दोन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्रिभुवन यांच्या भावाचे निधन झाल्याने त्या अंत्यदर्शनासाठी विश्रांतवाडी येथे त्यांच्या भावाच्या घरी गेल्या होत्या. तेथे त्यांना रडू कोसळले.

त्याचवेळी त्रास सुरू झाल्याने नातेवाइकांनी त्रिभुवन यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भाऊ आणि बहिणीचे निधन झाल्याने नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला रजनी त्रिभुवन या २००४ ते २००६ या दोन वर्षांच्या काळात पुण्याच्या महापौर होत्या.

या काळात त्यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. शहरातील विविध प्रश्‍नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने माजी महापौर संघटना स्थापन केली होती. त्यामध्ये त्रिभुवन या सक्रिय होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com