लेखकांनी हिंदुत्ववादी का असू नये?

लेखकांनी हिंदुत्ववादी का असू नये?

पुणे, ता. १५ : ‘‘लेखकांनी पुरोगामी असायला हरकत नाही. परंतु हिंदवी स्वराज्यात लेखकांनी हिंदुत्ववादी का असू नये? साहित्य प्रवाहाकडे नजर टाकली, तर लेखक सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाताना दिसतात आणि हिंदूंच्या श्रद्धेची चेष्टा करताना दिसतात. हे थांबले पाहिजे,’’ असे मत समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून विजय शेंडगे लिखित ‘लव्ह जिहाद’ या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी लेखक विजय शेंडगे यांच्यासह शेठ दगडूराम कटारिया हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय शेंडगे, मामाज्‌ स्पॉट प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोहनराव देवकर, सुरेंद्र पठारे, अक्षय चव्हाण उपस्थित होते.
कादंबरी लेखनामागील भूमिका मांडताना विजय शेंडगे म्हणाले, ‘‘हिंदूंनी आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगायला शिकले पाहिजे. इतिहासातील महापुरुषांच्या नावाने केवळ घोषणा देऊन निभावणार नाही. जातपात विसरून, आरक्षण आणि अन्य स्वरूपाचे स्वार्थ बाजूला ठेवून हिंदूंनी एक व्हायला हवे. या एकाच हेतूने मी ही कादंबरी लिहिली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com