सामाजिक निधी उभारणीसाठी 
‘सीएसआर हेल्पलाइन’

सामाजिक निधी उभारणीसाठी ‘सीएसआर हेल्पलाइन’

पुणे, ता. १६ ः सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण व्हावे, या उद्देशाने पुण्यात सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या पुढाकाराने सीएसआर कार्यशाळा आयोजित केली आहे. अनेक सामाजिक संस्था उपक्रम राबवितात. मात्र, त्यांना निधीची कमतरता असते. त्यामुळे या कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन व निधी उभारणीसाठी सीएसआर हेल्पलाइनचा शुभारंभ देखील शनिवारी (ता. १८) फर्ग्युसन महाविद्यालयातील केमिस्ट्री हॉल येथे दुपारी ४ वाजता होणार आहे, अशी माहिती सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाचे संस्थापक अध्यक्ष विजय वरुडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी अनिल नाईक, चेतन मराठे, सागर पाटील, पौर्णिमा कुलकर्णी, सारिका साठे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com