‘मसाप’ची विशेष ग्रंथकार पारितोषिके जाहीर

‘मसाप’ची विशेष ग्रंथकार पारितोषिके जाहीर

पुणे, ता. १६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके गुरुवारी जाहीर झाली. या पारितोषिकांसाठी डॉ. शैलजा बापट (रामाचार्य अवधानी पारितोषिक), मनोहर जाधव (भा. रा. तांबे पारितोषिक), हिमांशू कुलकर्णी (नारायण सुर्वे पारितोषिक), अतुल पेठे (कमलाकर सारंग पारितोषिक) आदींचा समावेश आहे.

पारितोषिकांसाठी तमन्ना इनामदार (ज्योत्स्ना देवधर पारितोषिक), आनंद माडगूळकर, जवाहर मुथा (मालिनी शिरोळे पारितोषिक), ज्ञानदा नाईक (ग. ह. पाटील पारितोषिक), प्रभाकर ओव्हाळ (ताईसाहेब कदम पारितोषिक), महाराष्ट्र टाइम्सचे संपादक पराग करंदीकर (रा. अ. कुंभोजकर पारितोषिक), लोकमतचे संपादक संजय आवटे (आशा संत पारितोषिक), सुधीर गाडगीळ (श्रीकांत चौगुले शब्दमैफल पारितोषिक), संतोष काळे (ना. घ. देशपांडे पारितोषिक), सुनील विभूते (गो. रा. परांजपे पारितोषिक), संजय सोनवणी (श्रीपाद जोशी पारितोषिक), सुभाष कवडे, वर्षा गजेंद्रगडकर (शांतादेवी आणि बाबूराव शिरोळे पारितोषिक) यांची निवड करण्यात आली आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

ही पारितोषिके २६ मे रोजी सकाळी ११.०० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.
-------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com