दारूसाठी पैसे न दिल्याने
येरवड्यात वृद्ध आईचा खून

दारूसाठी पैसे न दिल्याने येरवड्यात वृद्ध आईचा खून

पुणे, ता. १६ ः दारूसाठी पैसे दिले नाहीत, म्हणून ३० वर्षीय मुलाने आणि नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलाने बेदम मारहाण करून वृद्ध महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या वृद्ध आईचा रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.

मंगल मोहन नेटके (वय ६०, रा. कामराजनगर, येरवडा) असे खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा मुलगा मयूर मोहन नेटके व अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बहिणीच्या मुलीने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नेटके या कामराजनगरमध्ये मुलासोबत राहण्यास होत्या. त्या घरगुती कामे करत, तसेच, एका कार्यालयातदेखील साफ-सफाईचे काम करत होत्या. त्या कार्यालयाकडून त्यांचा पगार झाला होता. त्याचे पैसे त्यांच्याकडे होते. आर्इचा पगार झाल्याचे समजल्यानंतर मयूर याने नेटके यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते, परंतु आईने पैसे देण्यास नकार दिला. याचा राग मयूरच्या डोक्यात होता. त्याने नातेवाईक मुलासोबत आईला बेदम मारहाण केली. त्यात नेटके गंभीर झाल्या. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
--------------
हांडेवाडी रस्त्यावर
आचाऱ्याचा खून
हांडेवाडी-सय्यदनगर रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमधील आचाऱ्याचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस तपासातून त्याचा खून झाल्याचे समोर आले आहे.
राजेंद्र रामभाऊ शेजूळ (वय ३५, रा. उंड्री) असे खून झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी त्यांची पत्नी भाग्यश्री शेजूळ (वय २९) यांनी हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ७ ते १२ मे दरम्यान हांडेवाडीतील रिदम सोसायटीच्या परिसरात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजूळ हे एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. राजेंद्र यांचा रिदम सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीने डोक्यात व शरीरावर धारदार हत्याराने वार करून खून केला. खुनामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com