अर्ध्या महाराष्ट्राला वळिवाच्या पावसाने झोडपले

अर्ध्या महाराष्ट्राला वळिवाच्या पावसाने झोडपले

पुणे, ता. १६ : राज्यात यंदा अर्ध्या महाराष्ट्राला वळिवाच्या पावसाने आतापर्यंत झोडपले आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट करत पडलेल्या राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे.

राज्यात १ ते १६ मे या दरम्यान सरासरी १६.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत ३६.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत राज्यात ११८ टक्के पाऊस जास्त झाल्याची नोंद हवामान खात्यात झाली आहे. महाराष्ट्राच्या शेजारील गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये तेथील सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस पडल्याचे खात्यातर्फे सांगण्यात आले. कर्नाटकमध्ये पावसाने सरासरीही गाठली नसून तेलंगणामध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस पडला आहे.

राज्यात यंदा उन्हाचा चटका वाढला आहे. एप्रिलमध्ये सातत्याने सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदले गेले. त्यानंतर आता अर्ध्याहून अधिक राज्यात वळिवाचा पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.
---------------
जास्त पाऊस पडलेले जिल्हे (सरासरीच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त)
पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, बीड, लातूर, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदीया.
...........
सरासरीपेक्षा जास्त पावसाचे जिल्हे (सरासरीच्या २० ते ५९ टक्के)
जळगाव आणि नांदेड
...........
पावसाची सरासरी गाठलेले जिल्हे (सरासरीच्या १९ टक्के)
सातारा, नगर, जालना, गडचिरोली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com