खर्चातील तफावतीप्रकरणी
सुळे, पवार यांना नोटिसा

खर्चातील तफावतीप्रकरणी सुळे, पवार यांना नोटिसा

पुणे, ता. १६ : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र
पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना निवडणूक खर्चातील तफावतीप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने नोटिसा दिल्या आहेत. चार जूननंतर आयोगाकडून येणाऱ्या निरीक्षकांसमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून, त्यानंतर आयोगाकडून याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान झाले. या मतदारसंघातून सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात सरळ लढत होती. निवडणुकीदरम्यान सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून प्रचारात करण्यात आलेला खर्चाचा अहवाल आयोगाकडे वेळोवेळी सादर करण्यात आला होता. या दोन्ही उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चाची पहिली तपासणी २५ एप्रिल, दुसरी तपासणी १ मे आणि तिसरी तपासणी ६ मे रोजी करण्यात आली. या तिन्ही तपासणीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचारखर्चात तफावत आढळून आली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी या दोन्ही उमेदवारांना नोटीस बजावली होती.

दरम्यान, ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निकालानंतर आयोगाकडून नेमण्यात आलेले खर्च निरीक्षक पुण्यात येणार आहेत. त्यानंतर या संदर्भात ते सुनावणी घेणार आहेत. तेव्हा उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना या सुनावणीस हजर राहून खर्चातील तफावतीबाबत बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. उमेदवारांना ही तफावत मान्य नसेल, तर त्यावरील अहवाल या निरीक्षकांकडून आयोगाकडे पाठविला जाणार आहे. त्यावर अंतिम केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
-------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com