

पुणे, ता. २१ ः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कारांची घोषणा झाली.
यंदा राजा फडणीस पुरस्कृत ‘उत्कृष्ट शाखा’ पुरस्काराचा फिरता करंडक बा. सी. मर्ढेकरांच्या घराचे नूतनीकरण करणाऱ्या, अभिजात दर्जासाठीची चळवळ उभारणाऱ्या आणि गेली अनेक वर्षे मराठी भाषा पंधरवडा साजरा करणाऱ्या मसापच्या सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेला जाहीर झाला आहे. तसेच, राजन लाखे पुरस्कृत बाबूराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ ‘वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार’ गेली ३५ वर्षे सतत उपक्रमशील राहून ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करणाऱ्या मसापच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शाखेला जाहीर झाला आहे.
रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कार्यकारी मंडळात आणि शाखेत उत्तम काम करणाऱ्या कार्यकर्त्यास देण्यात येणारा ‘कार्यकर्ता पुरस्कार’ कोकणात साहित्य परिषदेच्या शाखांचा विस्तार करून वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयीन उपक्रम घेणारे चिपळूणचे प्रकाश देशपांडे यांना आणि वारजे-कोथरूड शाखेच्या माध्यमातून विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या पुण्याच्या माधुरी वैद्य यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह, असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सोमवारी (ता. २७) सकाळी १०.३० वाजता माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या ११९ व्या वर्धापनदिन सोहळ्यात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.