वंचित विकासतर्फे शनिवारी ‘अभया’चा दशकपूर्ती सोहळा

वंचित विकासतर्फे शनिवारी 
‘अभया’चा दशकपूर्ती सोहळा
Published on

पुणे, ता. २१ ः वंचित विकास संस्थेतर्फे संचालित ‘अभया’ या एकल महिला मैत्रीगट चळवळीचा दशकपूर्ती सन्मान सोहळा शनिवारी (ता. २५) आयोजित करण्यात आला आहे. कर्वे रस्त्यावरील अश्वमेध हॉल येथे सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती ‘वंचित विकास’च्या कार्यवाह संचालक मीना कुर्लेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी संचालिका सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात सुनीता बनकर, मिलिंद लबडे, दैवशाला थोरबोले, शोभा वाईकर, वंदना अवघडे यांना ‘अभया सन्मान’ प्रदान करण्यात येणार असून दीपिका जंगम यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. यावेळी उन्मेष प्रकाशनच्या संचालक मेधा राजहंस, निवेदक, लेखिका माधुरी ताम्हणे उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com