Kalyaninagar Pune Accident : आरोपीची वैद्यकीय तपासणी नऊ तासांनंतर

अपघातानंतर जवळपास नऊ तासांनी पोलिस संशयित आरोपीला घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाले.
Kalyaninagar Pune Accident
Kalyaninagar Pune Accidentsakal
Published on

पुणे : अपघातानंतर जवळपास नऊ तासांनी पोलिस संशयित आरोपीला घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल झाले. वैद्यकीय तपासणीसाठी आरोपीला इतक्या उशिरा का आणले, इतका वेळ कशामुळे लागला, हा वेळ घालवल्यामुळे वैद्यकीय तपासणी आणि रक्तनमुन्यांवर काही परिणाम झाला का, असे अनेक प्रश्न आता पुढे आले आहेत.
कल्याणीनगरमध्ये रविवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास दुर्घटना घडली.

...............

त्यानंतर प्रत्यक्षात गुन्हा सोमवारी सकाळी साडेआठ वाजता दाखल झाला. मात्र, संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या दरम्यान आणले गेल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली.
या बाबत ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. यल्लपा जाधव म्हणाले, “पोलिसांनी आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी आणले त्यावेळी अकरा ते साडेअकरा दरम्यानची वेळ होती. आरोपीची वैद्यकीय तपासणी नियमाप्रमाणे करण्यात आली.

त्यानंतर त्याचे रक्तनमूने संकलित करून ते विश्लेषणासाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. त्यातून आरोपीच्या रक्तात अल्कोहोलचा अंश आहे की, नाही याची निश्चित माहिती मिळेल.”

“आरोपीने किती प्रमाणात कोणत्या प्रकारचे अल्कोहोल घेतले आहे, अल्कोहोल घेण्याची वेळ आणि वैद्यकीय तपासणीची वेळ यात किती अंतर आहे, या आधारावर वैद्यकीय तपासणीचे निष्कर्ष ठरतात. मात्र, रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण हे प्रयोगशाळेतील रक्ततपासणीनंतर स्पष्ट होते,” असे न्यायवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

अल्कोहोलची वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया
- रुग्णाच्या तोंडाला अल्कोहोलचा वास येतो का?
- आपण काय बोलतोय ते त्याला समजते आहे का?
- चालताना तोल जात आहे का?
- शर्टची बटणे व्यवस्थित काढून लावता येतात का?
- पेन हातात धरून लिहिता येते का?

---
किती अल्कोहोलचा शरीरावर कसा परिणाम होतो?

१०० मिलिलिटर रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण (टक्के) .................. शरीरावर होणारा परिणाम
० ते ५० मिलीग्रॅम .................................. सौम्य उत्साह वाटतो
५० ते १०० मिलीग्रॅम ...... एकाग्रता कमी होते, शब्द अस्पष्ट येतात, संतुलन बिघडते, डोळ्यांच्या बुब्बुळाची हालचाल वाढते.
१०० ते ३०० मिलीग्रॅम ...... स्नायूंमध्ये समन्वय रहता नाही, व्यवस्थित चालता न येणे, तंद्रीत जाणे, मानसिक संतुलन हरपणे, संवेदना कमी होणे
३०० ते ४०० मिलीग्रॅम ..... कोमात गेल्यासारखे पडणे, भान हरपणे
४०० पेक्षा जास्त मिलीग्रॅम ..... कोमात जाणे, प्रतिसाद न देणे, मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com