खराडीतील दोन रूफटॉप हॉटेल पाडली

खराडीतील दोन रूफटॉप हॉटेल पाडली
Published on

पुणे, ता. २१ ः शहरातील अनधिकृत पब, बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याचे समोर आल्यानंतर महापालिकेने रूफटॉप हॉटेलविरोधातील थंडावलेली कारवाई पुन्हा एकदा उघड केली आहे. आज (ता. २१) खराडी भागातील दोन रूफटॉप हॉटेलवर कारवाई करून शेड काढून टाकले.
शहरात अनधिकृत रूफटॉप हॉटेलची शेकडोने संख्या आहे. त्यावर महापालिका आणि पोलिसांकडूनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे हॉटेलमालकांना मोकळे रान मिळाले आहे. महापालिकेच्या दप्तरीवर केवळ ८९ हॉटेलची नोंद आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने खराडी भागात सर्व्हे क्रमांक ५९ मधील हॉटेल टीकटीक आणि हॉटेल क्वार्टर या दोन रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली. यापूर्वी या दोन्ही हॉटेलला दोन वेळा महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९४९ च्या कलम ५३ नुसार नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही हॉटेल सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे आता तिसरी नोटीस देऊन कारवाई करण्यात आली. या दोन्ही हॉटेलमालकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांनी सांगितले.

बाणेर, बालेवाडी भागात कारवाई कधी
शहरात सर्वांत जास्त अनधिकृत रूफटॉप हॉटेल बाणेर, बालेवाडी, कोरेगाव पार्क या भागात आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू असल्याने या भागातील स्थानिक रहिवाशांना त्रास होत आहे. याविरोधात तक्रारी केल्या तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे एवढी मोठी दुर्घटना घडूनही या भागात कारवाई कधी? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com