व्यवस्थापनशास्त्रात आता ‘एआय’ची चलती!

व्यवस्थापनशास्त्रात आता ‘एआय’ची चलती!

पुणे, ता. २३ ः कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) केवळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातच आमूलाग्र बदल घडतात, असे नाही. तर व्यवस्थापनशास्त्रातही रोजगाराभिमुख शिक्षणासाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नव्या अभ्यासक्रमांबरोबरच पारंपरिक व्यवस्थापन शास्त्रातील अभ्यासक्रमांत संगणक उपाययोजना आणि एआयची चलती वाढली आहे.
व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेत मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (एमबीए) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी मनुष्यबळ व्यवस्थापन (एचआर), मार्केटिंग, व्यवसाय विश्लेषण (बिझनेस अनॅलॅटीक्स), सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा विषयांना प्राधान्य देत आहे. त्याचबरोबर मागील दोन वर्षांपासून एमबीए इन एआय ॲण्ड मशिन लर्निंग नावाचे अभ्यासक्रम सुरू झाले असून, विद्यार्थ्यांचीही त्याला पसंती दिसत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये कितपत स्थान मिळते, हे अभ्यासक्रमांचे फलित आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या स्टॅटिस्टिक्स ॲण्ड कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स या विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. नितीन घोरपडे सांगतात, ‘‘वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा हळूहळू पारंपरिक अभ्यासक्रमांकडून एआय अंतर्भूत शिक्षणाकडे वळत आहे. वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारप्रक्रिया प्रगल्भ असून, एआयसाठी त्याचा फायदा होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना एक नवीन दालन खुले झाले आहे.’’ नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील बहुतेक सर्व अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

दूरस्थ व ऑनलाइन एमबीएला पसंती...
नोकरी करताना अतिरिक्त पदवी म्हणून किंवा पदोन्नतीसाठी एमबीए करणाऱ्यांचे प्रमाणावर मागील काही वर्षांत वाढले आहे. त्यासाठी ऑनलाइन किंवा दूरस्थ एमबीएचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, या अभ्यासक्रमांमुळे खरंच पदोन्नती मिळते का? किंवा विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास होतो का? हा अभ्यासाचा विषय आहे.

उद्योगांमध्ये रोबोटिक्स, ब्लॉकचेन आदी एआयशी निगडित गोष्टींचा अंतर्भाव झाला आहे. दिवसागणिक बदलणाऱ्या उद्योगांच्या गरजा आणि उपलब्ध अभ्यासक्रमातील दरी मिटविण्यासाठी एआय आणि तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. म्हणूनच आम्ही बी.कॉम. पासूनच अभ्यासक्रमात एआयचा अंतर्भाव केला आहे.
डॉ. यशोधन मिठारे, अधिष्ठाता (अतिरिक्त कार्यभार), सा.फु. पुणे विद्यापीठ

व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालये (पुणे विद्यापीठ अंतर्गत)
पुणे जिल्हा ः १५५
नगर जिल्हा ः २३
नाशिक जिल्हा ः ३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com