विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क
वसतिगृहात प्रवेश सुरू

विश्रांतवाडी, कोरेगाव पार्क वसतिगृहात प्रवेश सुरू

पुणे, ता. २९ : विश्रांतवाडी येथील एक हजार मुले व मुलींचे शासकीय वसतिगृह युनिट १, संत ज्ञानेश्वर मुलांचे शासकीय वसतिगृह व कोरेगाव पार्क येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात पुढील शैक्षणिक वर्षासाठी (२०२४-२५) प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या वसतिगृहात कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय गुणवत्तेवर प्रवेश देण्यात येणार असून विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, अंथरूण, पांघरूण, भोजन, पुस्तके, स्टेशनरी, शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक साहाय्य, दरमहा निर्वाह भत्ता आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
वसतिगृहाच्या प्रवेशासाठी विश्रांतवाडी येथील युनिट क्रमांक १ वसतिगृहात प्रवेश अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुकांनी वसतिगृहातून विनामूल्य प्रवेश अर्ज घेऊन जावे, असे आवाहन वसतिगृहाचे गृहप्रमुख पी. बी. सुतार यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com