जोयआलुक्कास ब्रॅंडला 
‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

जोयआलुक्कास ब्रॅंडला ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ प्रमाणपत्र

पुणे, ता. १ : जागतिक स्तरावरील ज्वेलरी ब्रॅंड असलेल्या ‘जोयआलुक्कास’ला ‘कामाचे सर्वोत्तम ठिकाण’ अर्थात ‘ग्रेट प्लेस टू वर्क’ हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे समाधान आणि उत्कृष्ट कार्यपद्धतीच्या सर्वेक्षणाच्या आधारे हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. जोयआलुक्कास ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जॉय आलुक्कास म्हणतात, ‘‘ग्राहकांबरोबरच कर्मचाऱ्यांच्या समाधानाला प्राधान्य देत असल्याचा आम्हाला आनंद आहे. मेहनती आणि वचनबद्ध असलेले कर्मचारी आमचे आधारस्तंभ आहेत. देशभरातील १० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांच्या समाधानाचे प्रतीक म्हणजे हे प्रमाणपत्र आहे.’’ जोयआलुक्कास समुहाचे ११ देशांत १६० शोरूम्स आहेत, ज्यात नऊ हजारांपेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com