‘आपले संविधान’ पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचे प्रकाशन

‘आपले संविधान’ पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचे प्रकाशन

पुणे, ता. १ : सुभाष वारे लिखित ‘आपले भविष्य भारतीय संविधान’ या पुस्तकाच्या नवव्या आवृत्तीचे प्रकाशन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते झाले. डॉ. आढाव यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी शीला आढाव, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष लोमटे, हमाल मापाडी महामंडळाचे शिवाजी शिंदे, हमाल पंचायत, पुणेचे सरचिटणीस गोरख मेंगडे, कामगार नेते संतोष नांगरे, महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शारदा वाडेकर, फाउंडेशनचे सहसचिव टी. उपेंद्र, व्यवस्थापक राहुल भोसले उपस्थित होते. ‘‘संविधान साक्षरता अभियानासाठी एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनने प्रकाशित केलेले हे पुस्तक साध्या, सोप्या आणि प्रवाही भाषेत भारतीय संविधानाची माहिती महाविद्यालयीन युवा, शिक्षक, प्राध्यापक, संविधानप्रेमी कार्यकर्ते, तसेच शेतकरी आणि कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचवत असल्याने त्याचे खूप महत्त्व आहे,’’ असे प्रतिपादन बाबा आढाव यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com