अहिल्यादेवी होळकर यांना 
संघटनांतर्फे अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना संघटनांतर्फे अभिवादन

पुणे, ता. १ : अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध संस्था, पक्ष आणि संघटनांतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार व निराश्रित व्यक्तिविकास विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात विभागाच्या प्रदेशाध्यक्षा राधिका मखाले यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कल्पना उनवणे, विशाल गोते, कल्पना पांगसे, रूपाली पोटे, लक्ष्मी दिवटे, तारा शर्मा, राकेश कोलते उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सीमा महाडीक, छाया जाधव, सोनिया ओव्हाळ, सुंदर ओव्हाळ, ऋचा शिलेदार, अस्मिता गायकवाड, रेहाना शेख उपस्थित होत्या. कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णा भरेकर यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सुवर्णा भरेकर, रत्ना जगताप, मीना गोसावी, विद्या चव्हाण, प्रतिक्षा भरम उपस्थित होत्या. पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सारसबागेसमोरील अहिल्यादेवी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष द. स. पोळेकर, विवेक गुडमेट्टी, नाना भेगडे, सुलभा भोंडवे, शालिनी शिंदे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com