अभ्यासक्रम आराखड्याची
पुनर्रचना करण्याची मागणी

अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना करण्याची मागणी

पुणे, ता. १ : राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीसाठी जाहीर केलेल्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा किचकट, दुर्बोध आणि चुकीचे भाषांतर असलेला आहे. त्यात अभ्यासक्रमाबाबत कोणतीही स्पष्टता दिसत नाही. त्यामुळे या अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना करावी, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
‘‘राज्य अभ्यासक्रम आराखड्यानुसार पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते. परंतु, या आराखड्याने भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कच मोडीत काढले आहेत. इतकेच नव्हे तर या आराखड्यात सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळेच आराखड्याच्या मसुद्याचा पुनर्विचार करून नव्याने अभ्यासक्रम आराखडा तयार करावा,’’ अशी मागणी केल्याचे पवार यांनी सांगितले. सरकारने राज्य अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना करावी, नव्याने आराखड्याचा मसुदा सादर करावा आणि तो तज्ज्ञांच्या अभिप्रायासाठी खुला करून अभिप्राय नोंदविण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असेही पवार यांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com