आमदार टिंगरे यांनी राजीनामा द्यावा : डंबाळे

आमदार टिंगरे यांनी राजीनामा द्यावा : डंबाळे

पुणे, ता. १ : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपींना वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी मदत केल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच, सरकारने अपघातामधील मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना पाच कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी करीत सात जून रोजी विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथे सकाळी ११ वाजता आत्मक्लेष आंदोलन करणार असल्याची माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

अपघातानंतर मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याऐवजी टिंगरे यांनी आरोपींना चांगली वागणूक मिळावी यासाठी मदत केली. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसंदर्भात टिंगरे यांनी मदत केली होती. टिंगरे हे अग्रवाल कुटुंबीयांचे व्यावसायिक भागीदार आहेत. ही गोष्ट लपविली जात आहे. टिंगरे यांच्याविषयीची लेखी तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com